संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई (महाराष्ट्र) : आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरणठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे.

मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपीअपंगत्वामुळे (Spinal Cord Injury) आयुष्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने “Will on Wheelz” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २५जानेवारी २०२६ रोजी Courtyard by Marriott, नेरुळ येथे करण्यातआलेहा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हतातर संघर्षातून ध्येयाकडेआणि ध्येयाकडून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाचा उत्सव होता.

कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतपर भाषणाने झालीत्यानंतरअपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या निशांत खाडे यांच्या २५ वर्षांच्याखडतर जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत सादर करण्यातआलीया चित्रफितीत वेदनाजिद्दध्येयचिकाटीविनोदबुद्धीअपयशआत्मसंघर्ष आणि विजयाचे अनेक क्षण उलगडले गेलेज्यांनीउपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला.

यानंतर निशांत खाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिस्थितीशी कसेजुळवून घ्यावेयोग्य निवडी कशा कराव्यात आणि दुखापतीनंतरआयुष्याचा मार्ग नव्या उद्देशाने कसा शोधावायावर आपले मनोगत व्यक्तकेले.

ते म्हणाले,

व्हीलचेअरमुळे माझ्या दैनंदिन हालचालींचा मार्ग बदलला, पण माझीस्वप्ने, माझी उद्दिष्टे, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणिअर्थपूर्ण आयुष्य जगण्याचे बळ कधीच कमी झाले नाही. ‘Will on Wheelz’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात साथदिलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करण्याची आणि घडलेल्या घटनेचीआठवण करून देण्याची संधी मला मिळाली. माझे प्रयत्न आणि संघर्षहेच सांगतात की दुखापतीनंतर आयुष्य थांबत नाहीते बदलते, घडतेआणि अधिक अर्थपूर्ण बनते.”

यानंतर झालेल्या पॅनल चर्चेत डॉकेतना मेहताशिवजीत सिंग राघवश्रीअरविंद रमेश प्रभूडॉप्रविण आरअमीन आणि निशांत खाडे यांनीसहभाग घेतलावैद्यकीय तज्ज्ञांचे अनुभवपुनर्वसनाची प्रक्रियामार्गदर्शनआणि प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष यांचा संगम साधत पुनर्प्राप्तीजगण्याची जिद्द आणि समावेशनावर सखोल  संवेदनशील चर्चा झाली.

कार्यक्रमात निशांत खाडे यांच्या Access4All Foundation याउपक्रमाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठीसुलभता, समावेशन आणि स्वावलंबन वाढवणे, त्यांचा हरवलेलाआत्मविश्वास पुन्हा जागवण्यासाठी जनजागृती, धोरणात्मक हस्तक्षेपआणि सामाजिक संवादाच्या माध्यमातून ही संस्था सातत्याने कार्यरतआहे.

तसेच निशांत खाडे यांच्या ‘Beyond the Barriers’ या व्हीलचेअरवरूनसंपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचा उल्लेख करण्यात आला. याप्रवासाच्या माध्यमातून दिव्यांगतेबाबतचे गैरसमज, सुलभतेची गरज आणिआत्मनिर्भरतेचा संदेश देशपातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

या दीर्घ प्रवासात Nina Foundation यांनी दिलेला वैद्यकीय, मानसिकआणि भावनिक आधार निशांत खाडे यांच्या आयुष्यात निर्णायक ठरला. विशेषतः श्री. अरविंद प्रभू यांनी दिलेला निस्वार्थ आधार, प्रेम आणिजिव्हाळा हा या प्रवासाचा खंबीर आधारस्तंभ ठरला. अडचणीच्या काळातदिलेला हात केवळ आधार ठरत नाही, तर आयुष्याला पुन्हा उभे राहण्याचीप्रेरणा देतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी निशांत खाडे यांच्या प्रवासात मोलाचीभूमिका बजावलेल्या डॉक्टरथेरपिस्टमार्गदर्शक आणि हितचिंतकांचासन्मान करण्यात आला.

हा संपूर्ण प्रवास एक ठाम आणि आश्वासक संदेश देऊन जातो

अपघात शरीराला मर्यादा घालू शकतोपण स्वप्नांना नाही.

दुखापत हालचाली थांबवू शकते, पण विचारांना नाही. आणि परिस्थिती आयुष्य बदलू शकतेपण इच्छाशक्तीला कधीच हरवूशकत नाही.

वैद्यकीय सुविधातज्ज्ञ मार्गदर्शनसातत्यपूर्ण पुनर्वसन आणि सर्वातमहत्त्वाचे म्हणजे विश्वास देणारी माणसे सोबत असतीलतरदुखापतीपलीकडचे आयुष्य केवळ संघर्षमय राहत नाहीतर ते अधिकसन्मानपूर्णउद्देशपूर्ण आणि समाजाला दिशा देणारे ठरते.

निशांत खाडे यांचा २५ वर्षांचा प्रवास ही केवळ वैयक्तिक यशाची कथानसूनप्रत्येक अडचणीत सापडलेल्या आणि परिस्थितीशी झगडणाऱ्याव्यक्तीसाठी आशेचा किरण आहे.

हार मानू नकाथांबू नकास्वतःवर विश्वास ठेवा.

कारण आयुष्य थांबत नाहीते तुमच्या जिद्दीप्रमाणे योग्य दिशेने घडतजातं.

  • Related Posts

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    मुंबई (महाराष्ट्र), अप्रैल 10 : अराइया बाय अज़ा, एक नेक्स्ट–जनरेशन फाइन ज्वेलरी ब्रँड, आपल्या नैतिक पद्धतीने तयार केलेल्या लॅब–ग्रोउन डायमंड ज्वेलरीद्वारे आधुनिक लक्झरीची व्याख्या नव्याने करत आहे. नवकल्पना, शाश्वतता आणि…

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    नई दिल्ली, मार्च 26: वित्त आणि लेखा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ACCA आणि CFA या दोन पदव्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जातात. २०२६ मधील बदलती आर्थिक परिस्थिती आणि…

    You Missed

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे!  ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी